नगर शहरातील 12 ठिकाणचे भाजीपाला बाजार बंद

नगर शहरातील 12 ठिकाणचे भाजीपाला बाजार बंद

अहमदनगर (प्रतिनिधी) -

करोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील 12 ठिकाणचे भाजीपाला बाजार बंद केले आहे. मनपा आयुक्त

शंकर गोरे यांनी यासंदर्भात बुधवारी रात्री उशिरा आदेश काढला. हे बाजार 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील, असे आदेशात म्हटले आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरोधात दंडात्मक आणि फौजदारी कारवाईचे संपूर्ण अधिकार शहर पोलिसांना देण्यात आले आहे.

अमरधामसमोर गाडगीळ पंटागण, दिल्ली दरवाजा, चितळेरोड भाजीबाजार, गंजबाजार येथील भाजी मार्केट, प्रोफेसर कॉलनी चौकातील भाजीबाजार, पाईपलाईन रोड, यशोदानगरमधील भाजीबाजार, एकवीरा चौकातील भाजीबाजार, नागापूर गावठाणमधील भाजीबाजार, केडगावच्या अंबिका बसस्टॉप येथील भाजीबाजार, शाहूनगर पाच गोडाऊन येथील भाजीबाजार, लिंक रोड भूषणनगर चौकातील भाजीबाजार हे भाजीबाजार बंद करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com