श्रींचे व्दारकामाई मंदिरातील दर्शनाच्या वेळेत बदल

श्रींचे व्दारकामाई मंदिरातील दर्शनाच्या वेळेत बदल

शिर्डी |प्रतिनिधी|Shirdi

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने श्रींचे व्दारकामाई मंदिरातील दर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आला असून दि. 14 जुलै 2022 पासून श्रींची शेजारती होईपर्यंत श्रींचे व्दारकामाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

श्रीमती बानायत म्हणाल्या, श्रीक्षेत्र शिर्डी येथे देश-विदेशातून लाखो भाविक श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरिता येत असतात. या ठिकाणी आल्यानंतर भाविक श्रींच्या समाधीसह व्दारकामाई, चावडी व गुरुस्थान आदी ठिकाणी प्राधान्याने दर्शनाकरिता जातात. त्यातच बाबांनी त्यांच्या हयातीत संपूर्ण जीवन हे व्दारकामाई येथे व्यतीत केले. या ठिकाणाहून बाबांनी अनेक भाविकांना शिकवण, उपदेश, गोर-गरिबांची रुग्ण सेवा व अन्न दिले. तसेच याठिकाणी बाबांनी असंख्य भाविकांना आपल्या लिलाही दाखविल्या. त्यामुळे व्दारकामाईस अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या अनुषंगाने संस्थानच्या व्यवस्थापन समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत श्रींची शेजारती होईपर्यंत व्दारकामाई मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी खुले ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार श्रींचे व्दारकामाई मंदिरातील दर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आला असून गुरुवार दि. 14 जुलै 2022 पासून पहाटे 5 ते रात्रौ 10.30 (शेजारती होईपर्यंत) यावेळेत श्रींचे व्दारकामाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असल्याचे सांगून भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्रीमती बानायत यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com