वरवंडीसह 6 गावांसाठी पाणी पुरवठा योजनेला 32 कोटी 87 लाख रुपये निधी मंजूर

वरवंडीसह 6 गावांसाठी पाणी पुरवठा योजनेला 32 कोटी 87 लाख रुपये निधी मंजूर

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व इंद्रजीत थोरात यांच्या सततच्या सहकार्यातून पठार भागातील वरवंडी, खांबे, खरशिंदे, चौधरवाडी, कुंभारवाडी, दरेवाडी व कौठे मलकापूर या गावांकरिता जलजिवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत 32 कोटी 87 लाख 30 हजार रुपये मंजूर झाला असल्याची माहिती जि.प महिला बालकल्याण विभागाच्या सभापती सौ. मिराताई शेटे यांनी दिली आहे.

नुकतेच महाराष्ट्र सरकारकडून जलजिवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पठार भागातील वरवंडी, खांबे, खरशिंदे, चौधरवाडी, कुंभारवाडी,दरेवाडी व कौठे मलकापूर या गावांकरिता जलजिवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत 32 कोटी 87 लाख 30 हजार रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे या सर्व गावांना शाश्वत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.

Related Stories

No stories found.