वरवंडी शिवारातून वाळूचा डंपर पकडला

वरवंडी शिवारातून वाळूचा डंपर पकडला
file photo

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील वरवंडी शिवारातील मुळा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर राहुरी पोलिसांनी पकडला असून 3 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरंवडी मुळा नदीपात्रातून वाळू वाहतूक करणारा पांढर्‍या एमएच 16 सीसी-9563 क्रमांकाचा टाटा कंपनीचा डंपर 3 ब्रास बाळुसह सोमवारी मध्यरात्री वरवंडी गावातील चौकामध्ये पकडला आहे. याप्रकरणी पोलीस हे.कॉ. आदिनाथ पाखरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी आदिनाथ गोकुळ बर्डे (वय 26, रा. धनगरवाडी, ता. जि. नगर) याच्या विरोधात गु.र.नं.व कलम 312/2021 भादंवि. कलम 379 प्रमाणे राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना.एस.एम.जाधव करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com