वरखेडला 8 दिवस जनता कर्फ्यू

नाकाबंदीमुळे दोन ते अडीच हजार भविकांवर मागे परतण्याची वेळ
वरखेडला 8 दिवस जनता कर्फ्यू

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा (Newasa) तालुक्यातील श्री महालक्ष्मी देवीचे देवस्थान (Devasthan of Shri Mahalakshmi Devi) असलेल्या वरखेड (Varkhed) गावात आजपासून आठ दिवस जनता कर्फ्यू (Public curfew) लावण्यात आला असुन देवीच्या दर्शनासाठी आलेले दोन ते अडिच हजार भाविकांना पोलिसांनी व ग्रामस्थांनी केलेल्या नाकाबंदीमुळे दर्शनाविना माघारी परतावे लागले .

वरखेड (Varkhed) येथे ३० जुलै रोजी आषाढ मासानिमित्त श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी (Crowd) जमा झाली होती. त्या गर्दीला पुर्णपणे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यास जबाबदार धरून सरपंच, पोलीस पटलांसह देवस्थान विश्वस्त अशा 24 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे.

त्याधर्तीवर ग्रामपंचायत (Grampanchayat) पदाधिकारी व विश्वस्त मंडळाने निर्णय घेत आठ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण वरखेड गाव बंद ठेवले आहे. तर आज पुन्हा पोलीस निरीक्षक विजय करे (PI Vijay kare) यांनी वरखेड गावाला भेट देऊन मंदिर परिसरातील काही दुकानांचे शेड उचकटून टाकले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com