वरखेड येथील बालकाच्या हत्येची आरोपींनी दिली कबुली

वरखेड येथील बालकाच्या हत्येची आरोपींनी दिली कबुली

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा (Newasa) तालुक्यातील वरखेड (Varkhed) येथील 8 वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणाचा (Children murder case) उलगडा झाला असून वरखेड येथील दोघांनी मुलाच्या डोक्यात दगड मारुन जीवे ठार मारल्याची कबुली दिली असून मुलाच्या आईसह तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी (Police Cell) मिळाली आहे.

याबाबत माहिती अशी की, सोहम उत्तम खिलारे (वय 8 वर्षे) याची हत्या झालेबाबत वरखेडचे पोलीस पाटील संतोष भागीरथ घुंगास यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन 6 जुलै रोजी नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police station) गु र नं 482/2021 भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हयात मयत मुलाची आई सिमा उत्तम खिलारे (वय 27) हिस अटक (arrested) करण्यात आली होती.

पोलीस कोठडी दरम्यान तीने कबुली दिली. सुनिल किसन माळी व विष्णु हरीभाऊ कुंढारे (वय 32) दोघेही रा. वरखेड हे घटनास्थळी होते. सुनिल माळी याने सोहम यास चापटीने मारहाण केली. त्याने आरोपी सिमा खिलारे हीस सदर ठिकाणावरुन निघुन जाणेस सांगितले. त्यानंतर सुनील किसन माळी व विष्णू हरिभाऊ कुंढारे या दोघांनी मुलाच्या डोक्यात दगड मारुन जिवे ठार मारले अशी कबुली अटक आरोपींनी दिली.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय करे, सहाजक पोलीस निरीक्षक विजय ठाकुर, उपनिरीक्षक भारत दाते, उपनिरीक्षक एस. व्ही. भाटेवाल, पोलीस नाईक राहुल यादव, पोलीस नाईक महेश कचे, शाम गुंजाळ, वसीम इनामदार यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com