वंचित बहुजन आघाडीने ठोकले शड्डू!

स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर
वंचित बहुजन आघाडीने ठोकले शड्डू!

अहमदनगर | प्रतिनिधी

सत्ताधारी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा या पक्षांना एक पर्याय म्हणून आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी सांगितले.

वंचित आघाडी संघटन समीक्षा व संवाद मेळाव्यात ठाकूर बोलत होत्या. प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, प्रदेश उपाध्यक्ष सविता मुंडे, महिला आघाडी राज्य महासचिव अरुंधती शिरसाठ, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ठाकूर म्हणाल्या, आपल्या पक्षाकडे निधीची कमतरता असली तरी मात्र आपल्याकडे बाळासाहेब आंबेडकर यांचा जनाधार आहे यासाठी संघटन महत्त्वाचे आहे. संघटनेत कृतिशील कार्यकर्ता हा आधार आहे. प्रकाश आंबेडकर यांचा जनाधार व जीवाभावाची कार्यकर्ते पक्षाची ताकत आहे. आगामी निवडणुकांत सत्ता संपादन करून वंचितांना न्याय देण्याची भूमिका आहे.

दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे व युवा आघाडी महासचिव विशाल साबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ३०० ते ४०० महिला व तरुणांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केला. यावेळी नेते अरूण जाधव, दक्षिण जिल्हा अध्यक्ष बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जठार, युवा आघाडी जिल्हा महासचिव विशाल साबळे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गलांडे, जिल्हा सल्लागार जिवन पारधे, सचिव चंद्रकांत नेटके, संघटक फिरोज पठाण, चंद्रकांत डोलारे, युवा आघाडीचे सागर ढगे, प्रसाद भिवसने मयूर ओहळ, शहर जिल्हा अध्यक्ष संजय जगताप, भाऊसाहेब भिंगारदिवे यांच्यासह तालुका अध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महासचिव योगेश साठे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com