Arrested अटक
Arrested अटक

व्हॅनसह शितपेय चोरणार्‍याला अटक

तोफखाना पोलिसांची कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मारूती व्हॅनसह शितपेय चोरणार्‍याला तोफखाना पोलिसांनी 12 तासांत ताब्यात घेत गजाआड केले आहे. त्याच्याकडून व्हॅनसह शितपेय असा 75 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. चंद्रकांत नानाभाऊ आजबे (वय 39 रा. आदर्शनगर, एमआयडीसी, नगर) असे त्याचे नाव आहे.

चंद्रकांत बापुराव पाचारणे (वय 55 रा. एमआयडीसी, नगर) यांच्याकडे पेप्सी या शितपेय कंपनीची डिस्ट्रीब्युटरशीप आहे. त्यांच्याकडे माल वाहतुकीसाठी मारूती व्हॅन (एमएच 16 एटी 1713) असून त्यांनी ती व्हॅन मंगळवारी (दि. 17) दुपारी अडीचच्या सुमारास पाईपलाईन रस्त्यावरील हॉटेल सद्गुरू येथे उभी केली होती. व्हॅनला चावी असल्याचा फायदा घेऊन अज्ञाताने ती चोरून नेली होती. याप्रकरणी पाचारणे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, संदीप धामणे, अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, सचिन जगताप, सतीश त्रिभुवन, संदीप गिर्‍हे, बाळासाहेब भापसे, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतीश भवर, गौतम सातपुते, राहुल गुंडू यांच्या पथकाने व्हॅन चोरणार्‍याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार अनिल गिरीगोसावी करत आहेत.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com