वांबोरी उपबाजारात कांद्याची आवक घटली

वाचा भाव
वांबोरी उपबाजारात कांद्याची आवक घटली

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात (Onion Auction) मागील लिलावाच्या तुलनेत आवक घटली मात्र, कांद्याच्या (Onion) भावात 300 रूपयांनी वाढ झाली आहे. काल झालेल्या लिलावात 10 हजार 569 कांदा (Onion) गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावरान कांदा (Onion) 2 हजार 105 ते 2 हजार 800 रूपये दोन नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 505 ते 2 हजार 100 रूपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 ते 1 हजार 500 रूपये भावाने विकला गेला.

तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 1 हजार 500 ते 2000 रूपये भाव मिळाला. अपवादात्मक 34 कांदा (Onion) गोण्यांना 3 हजार 200 रूपये 29 कांदा (Onion) गोण्यांना 3 हजार 100 रूपये 67 कांदा (Onion) गोण्यांना 3 हजार रूपये तर 29 कांदा (Onion) गोण्यांना 2 हजार 900 रूपये भाव मिळाला. भुसार मालात बाजरी 1 हजार 800 ते 2 हजार 700 रूपये गहू 2 हजार 451 ते 3 हजार 400 रूपये हरभरा 4 हजार 300 ते 4 हजार 400 रूपये मठ 8 हजार 500 रूपये तर सोयाबीन (Soybeans) 5 हजार 200 ते 5 हजार 701 रूपये याप्रमाणे भाव मिळाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com