
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात (Onion) 5 हजार 847 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा लाल कांदा (Onion) 705 रुपये ते 1 हजार रूपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 405 रुपये ते 700 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 रुपये ते 400 रुपये भावाने विकला गेला.
तसेच गोल्टी कांद्याला 300 रुपये ते 500 रुपये भाव मिळाला.अपवादात्मक 29 कांदा (Onion) गोण्यांना 1 हजार 100 रुपये भाव मिळाला.तसेच भुसार मालात बाजरी 2 हजार 465 रुपये, गहू 1 हजार 800 रुपये ते 2 हजार 201 रुपये, तुर 7 हजार 500 रुपये, तर सोयाबीन (माती,खडा) 4 हजार 700 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.