वांबोरीत कांदा 1800, गहू 2600 रुपये

वांबोरीत कांदा 1800, गहू 2600 रुपये

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

वांबोरी उपबाजारात दि.2 जुलै रोजी झालेल्या कांदा लिलावात 13 हजार 28 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 200 रुपये ते 1 हजार 600 रुपये, दोन नंबरचा कांदा 900 ते 1 हजार एकशे पंच्यान्नव रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 895 रुपये भावाने विकला गेला.

तसेच गोल्टी कांद्याला 500 ते 900 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 52 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रुपये तर 133 कांदा गोण्यांना 1 हजार 700 रुपये भाव मिळाला. भुसार मालात बाजरी 1611 (डागी) रुपये, गहू 2200 ते 2600 रुपये व सोयाबीन 6000 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com