वांबोरीत कांद्याला मिळतोय हा भाव

वांबोरीत कांद्याला मिळतोय हा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात (Onion Auction) 15 हजार 805 कांदा गोण्याची आवक झाली.

एक नंबरचा गावरान कांदा (Onion) 1 हजार 300 ते 1 हजार 600 रूपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 900 ते 1 हजार 295 रूपये तर तिन नंबरचा कांदा 100 ते 895 रूपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 500 ते 900 रूपये भाव मिळाला.

अपवादात्मक 46 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रूपये व 107 कांदा गोण्यांना 1 हजार 700 रूपये भाव मिळाला. तसेच भुसार मालात गहू 2100 ते 2200 रूपये, हरभरा 3500 रूपये, सोयाबीन 4801 रूपये, मूग 6101 ते 7326 रूपये व भुईमूग शेंगा 3700 रूपये याप्रमाणे भाव मिळाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com