वांबोरीत गावरान व लाल कांद्याला मिळतोय 'हा' भाव

वांबोरीत गावरान व लाल कांद्याला मिळतोय 'हा' भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

सोमवारी वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात एकूण 9 हजार कांदा गोण्यांची आवक झाली. गावरान कांद्याला जास्तीत जास्त 2300 रुपयांपर्यंत तर लाल कांद्याला जास्तीत जास्त 3 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. गावरान कांद्याची आवक 4,854 गोण्या इतकी झाली.

एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 505 ते 2000 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 105 ते 1 हजार 500 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 1100 रुपये भावाने विकला गेला. गोल्टी कांद्याला 700 ते 1000 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 51 कांदा गोण्यांना 2 हजार 300 रुपये, 43 कांदा गोण्यांना 2 हजार 200 रुपये तर 36 कांदा गोण्यांना 2 हजार 100 रुपये भाव मिळाला. लाल कांद्याची एकूण आवक 4,151 कांदा गोणी झाली.

एक नंबरचा लाल कांदा 1 हजार 905 ते 2 हजार 500 रुपये, दोन नंबरचा 1 हजार 405 ते 1 हजार 900 रुपये तर तीन नंबरचा कांदा 200 ते 1400 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 1400 ते 1800 रूपये भाव मिळाला. अपवादात्मक 52 गोण्यांना 3 हजार रुपये, 59 गोण्यांना 2 हजार 800 रुपये, 49 कांदा गोण्यांना 2 हजार 700 रुपये तर 23 गोण्यांना 2 हजार 600 रुपये भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com