वांबोरीत गावरान कांदा 2000 तर लाल 2100 रुपये क्विंटल

वांबोरीत गावरान कांदा 2000 तर लाल 2100 रुपये क्विंटल

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

गुरूवार 15 डिसेंबर रोजी वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात एकूण 13 हजार 212 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 205 रुपये ते 1 हजार 600 रुपये, दोन नंबरचा कांदा 805 रुपये ते 1 हजार 200 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 800 रुपये भावाने विकला गेला.

तसेच गोल्टी कांद्याला 500 ते 800 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 78 कांदा गोण्यांना 2 हजार रुपये, 16 कांदा गोण्यांना 1 हजार 900 रुपये, 63 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रुपये तर 125 कांदा गोण्यांना 1 हजार 700 रुपये भाव मिळाला. त्याचप्रमाणे, लाल कांद्याची एकूण आवक 1 हजार 189 कांदा गोणी झाली असून एक नंबरचा लाल कांदा 1 हजार 605 रुपये ते 2 हजार रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 205 रुपये ते 1 हजार 600 रुपये तर तीन नंबरचा कांदा 300 ते 1200 रुपये भावाने विकला गेला.अपवादात्मक 38 कांदा गोण्यांना कांदा गोण्यांना 2 हजार 100 रुपये भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com