वांबोरीच्या ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना सेवा देण्यास आरोग्य पथक तत्पर

700 रूग्णांच्या करोना चाचण्या पूर्ण; दोनशे जणांना बाधा; खासगी डॉक्टरांनी दिला मदतीचा हात
वांबोरीच्या ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना सेवा देण्यास आरोग्य पथक तत्पर

उंबरे |वार्ताहर| Umbare

वांबोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना चांगली सुविधा देण्यास याठिकाणी काम करणारे सर्व डॉक्टर, नर्स व त्यांचे

आरोग्य कर्मचारीवृंद रात्रंदिवस कष्ट घेत असल्याने रुग्णांकडून त्यांचं अभिनंदन होत आहे.

प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी शासकीय पातळीवर वांबोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये वीस खाटांचे सेंटर सुरू केले आहे. सध्या वांबोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये 28 ते 29 रुग्ण उपचार घेत आहेत. वाढती रूग्णांची गर्दी पाहाता या ठिकाणी अजून दहाची व्यवस्था केली आहे. वांबोरी गावात दिवसागणिक वाढणारी रूग्णसंख्या लक्षात घेता प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

वांबोरी रुग्णालयाची प्रांताधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार एफ.आर. शेख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपाली गायकवाड यांनी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरची पाहणी केली होती.ग्रामीण रुग्णालयात एकाचवेळी 20 रुग्ण उपचार घेत होते.

परंतु एकूणच परिस्थितीचा आढावा घेत या ठिकाणी अजून दहाखाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. वांबोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये 700 रुग्णांच्या करोना चाचणी केली असून त्यामध्ये दोनशे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत अकराशे नागरिकांनी लसीकरणात सहभाग घेतला आहे.

ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. श्रीकांत पाठक, मेडिकल ऑफिसर डॉ. भारती पेचे, डॉ. अंजली मंडलिक, डॉ. जवरे यांच्यासह याठिकाणी काम करणारे आरोग्य कर्मचारीवृंद चांगल्यारितीने काम करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com