वांबोरी ग्रामीण रुग्णालय गेले कोमात

लक्ष द्या, अन्यथा बंद करा - माजी खा. तनपुरे
वांबोरी ग्रामीण रुग्णालय गेले कोमात

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) मोठी लोकसंख्या असलेल्या वांबोरी (Vambori) येथील ग्रामीण आरोग्य केंद्राची (Rural Health Center) केवळ कर्मचार्‍यांच्या अनास्थेमुळे संपूर्णपणे दुरवस्था झाली आहे. याबाबत त्वरित जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी लक्ष देऊन सुधारणा न केल्यास हे आरोग्य केंद्र बंद करावे व शासनाचा महिन्याला होणारा पंधरा ते वीस लाख खर्च वाचवावा, असा इशारा (Hint) माजी खा. प्रसादराव तनपुरे (former MP. Prasadrao Tanpure) यांनी दिला आहे.

वांबोरी आरोग्य केंद्राबाबत (Vambori Health Center) अनेक तक्रारी आल्यामुळे माजी खा. तनपुरे (former MP. Prasadrao Tanpure) यांनी अचानकपणे आरोग्य केंद्राला भेट दिली असता विदारक चित्र पाहायला मिळालेण वांबोरी ग्रामीण आरोग्य केंद्रासाठी जवळपास रोड लगतची आठ एकर जमीन असून तीस बेडचे सुसज्ज हॉस्पिटल, ऑपरेशन थिएटर, सर्व वैद्यकीय संसाधने इत्यादींवर जवळपास शासनाचा पाच कोटी रुपये खर्च झाला आहे. या आरोग्य केंद्रावर पंधरा ते वीस लाख रुपये कामगारांच्या पगारावर खर्च होतात. कर्मचार्‍यांसाठी सुसज्ज निवासस्थाने असताना येथे कोणताही कर्मचारी निवासात दिसत नाही. शवविच्छेदन गृहाची अवस्था अत्यंत वाईट असून रुग्णवाहिका असताना त्यावर चालक नाही म्हणून कैक दिवसांपासून बंद आहे. सुसज्ज लॅबरेटरी असताना केवळ येथील अटेंडंट नगर सिव्हिल रुग्णालयात काम करतो. त्यामुळे लॅबरेटरी बंद आहे. विदारक स्थिती पाहून तनपुरे यांनी सर्व विभागांची झाडाझडती घेतली. निवासस्थानाबाबत विचारले असता निवासस्थाने व्यवस्थित नसल्यामुळे सर्व कर्मचारी ग्रामीण रुग्णालय सोडून नगरला राहत असल्याचे समजते.

याबाबतच्या पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Department of Public Works) अधिकार्‍यांना तसेच महावितरणच्या अधिकार्‍यांनाही पाहणी व मदत करण्यासाठी तनपुरे यांनी पाठविले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी सकाळी साडेसातला येऊन सायंकाळी सात वाजेपर्यंत थांबल्यास, वेळ दिल्यास रुग्णसेवा चांगल्या प्रकारे मिळू शकेल, असे आवाहन त्यांनी केले. परंतु शुक्रवारी माहिती घेतली असता कोणीही अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याचे समजते. 70 बेडच्या कोविड सेंटरचे (Covid Center) काम पूर्णत्वास असून ऑक्सीजन प्लांट (Oxygen plant) पूर्णपणे तयार आहे. परंतु कर्मचार्‍यांच्या अनास्थेमुळे शासनाचा खर्च होऊन कोविड रुग्णांना सेवा मिळेल की नाही? याबाबत खात्री देता येत नसल्याची विषन्न प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

याबाबत जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी त्वरित लक्ष देऊन सुधारणा करावी, वांबोरी व परिसरातील नागरिकांना रुग्णसेवा चांगल्याप्रकारे मिळण्यासाठी लक्ष द्यावे, अन्यथा येथे ग्रामीण रुग्णालय बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी शामराव पठारे, कैलासराव ढोके, संजय पावले, बाळासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com