‘त्या’ जळालेल्या मृत युवकाची आठ दिवसानंतरही ओळख पटेना !

वांबोरी फाट्यावरची घटना || पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी सुरूच
‘त्या’ जळालेल्या मृत युवकाची आठ दिवसानंतरही ओळख पटेना !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेंडी (ता. नगर) (Shendi) शिवारातील वांबोरी फाटा (Vambori Phata) परिसरात 7 जानेवारी रोजी जळालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या युवकाची (Youth)ओळख अद्याप पटली नाही. ओळख पटल्यानंतरच त्याच्या खूनाचे (Murder) रहस्य उलगडणार आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व एमआयडीसी पोलिसांकडून (MIDC Police) यासाठी प्रयत्न केले जात आहे. नगर जिल्ह्याला लागून असलेल्या औरंगाबाद (Aurangabad), बीड (Beed), उस्मानाबाद (Usmanabad), सोलापूर (Solapur), पुणे (Pune), नाशिक (Nashik), ठाणे (Thane) जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 18 ते 25 वर्षीय युवकाच्या ‘मिसिंग’ची पडताळणी केली जात आहे.

‘त्या’ जळालेल्या मृत युवकाची आठ दिवसानंतरही ओळख पटेना !
भाच्याच्या निर्णयावर थोरातांनीच बोलावे; काय म्हणाले खा.डॉ.विखे पाटील वाचा...

वांबोरी फाटा परिसरातील बाळासाहेब गणपत मिस्कीन यांच्या शेत गट नं. 474 मध्ये एका बॅगमध्ये युवकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. रस्त्याने जाणार्‍या-येणार्‍या नागरिकांच्या ही घटना लक्ष्यात आली. त्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली होती. यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘त्या’ जळालेल्या मृत युवकाची आठ दिवसानंतरही ओळख पटेना !
हनीट्रॅप : व्यापार्‍याचे अश्लिल फोटो व व्हिडीओ काढून मागितली 30 लाखांची खंडणी

मयत युवकाची ओळख पटवून त्याचे खूनी शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह एमआयडीसी पोलिसांचे पथके काम करत आहेत. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यासह शेजारी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील ‘मिसिंग’ युवकांविषयी माहिती घेतली जात आहे. सुरूवातीला 20 डिसेंबर, 2022 ते 8 जानेवारी, 2023 दरम्यान दाखल असलेल्या ‘मिसिंग’ची तपासणी करण्यात आली आहे. आता 8 जानेवारीपासून पुढे दाखल झालेल्या ‘मिसिंग’ची पडताळणी केली जाणार आहे. ओळख पटली नसल्याने त्या युवकाच्या खूनाचे (Murder) रहस्य समोर आलेले नाही. पोलिसांकडून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

‘त्या’ जळालेल्या मृत युवकाची आठ दिवसानंतरही ओळख पटेना !
जिल्ह्यातील 'या' गावातील तलाठी कार्यालय गेल्या चार वर्षापासून बंद

दुसरीकडे नगर-औरंगाबाद रस्त्यावरील (Nagar Aurangabad Road) सर्व हॉटेल, आस्थापनांचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले जात आहे. तसेच त्या युवकाला पेट्रोल किंवा डिझेल टाकून पेटविले असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीकोणातूनही तपास केला जात आहे. यासाठी महामार्गावरील सर्व पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात आहे. दरम्यान गेल्या आठ दिवसांपासून पोलीस यावर काम करीत असले तरी ठोस असे धागेदोरे त्यांच्या हाती लागलेले नाही. यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

‘त्या’ जळालेल्या मृत युवकाची आठ दिवसानंतरही ओळख पटेना !
वराळ खून प्रकरणात तपास अधिकारी गोत्यात

शिरूरमध्येही महिलेला असेच जाळले

7 जानेवारी रोजी वांबोरी फाटा येथे युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर 8 जानेवारी रोजी शिरूर (जि. पुणे) तालुका पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेचा मृतदेह ही जळालेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेलाच मिळून आला आहे. तो मृतदेह ही पेट्रोल किंवा डिझेल टाकून पेटवला असल्याचा संशय आहे. दरम्यान युवक व महिलेचा मृतदेह यामध्ये काही बाबीत साम्य आढळून आल्याने त्यादृष्टीकोनातून पोलिसांकडून तपास केला जात आहे. यासाठी नगर पोलीस पुणे पोलिसांच्या संपर्कात असल्याचे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com