वांबोरीत कांदा 1 हजार 800 तर सोयाबीन 6 हजार 278 रुपये

वांबोरीत कांदा 1 हजार 800 तर सोयाबीन 6 हजार 278 रुपये

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

काल गुरूवार दि. 11 ऑगस्ट रोजी वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात 24 हजार 139 कांदा गोण्यांची आवक झाली.एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 300 ते 1 हजार 700 रुपये, दोन नंबरचा कांदा 900 ते 1 हजार 295 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 895 रुपये भावाने विकला गेला.

तसेच गोल्टी कांद्याला 600 ते 1000 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 71 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रुपये भाव मिळाला. भुसार मालात गहू 2 हजार 101 ते 2 हजार 500 रुपयेे तर सोयाबीन 5 हजार 600 ते 6 हजार 287 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com