वांबोरीतील गावरान व लाल कांद्याचा वाचा भाव

 वांबोरीतील गावरान व लाल कांद्याचा वाचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात गुरुवारी गावरान कांद्याला जास्तीत जास्त 2600 तर लाल कांद्याला जास्तीत जास्त 3100 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

एकूण 7 हजार 452 कांदा गोण्याची आवक झाली. गावरान कांद्याची आवक 5 हजार 106 झाली. एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 705 ते 2 हजार 200 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 305 ते 1 हजार 700 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 1 हजार 300 रुपये भावाने विकला गेला. गोल्टी कांद्याला 900 ते 1 हजार 200 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 36 कांदा गोण्यांना 2 हजार 600 रुपये, 104 कांदा गोण्यांना 2 हजार 500 रुपये, 64 कांदा गोण्यांना 2 हजार 400 रुपये तर 135 कांदा गोण्यांना 2 हजार 100 रुपये भाव मिळाला.

लाल कांद्याची एकूण आवक 2 हजार 346 गोणी आवक झाली. एक नंबरचा लाल कांदा 2 हजार 205 रुपये ते 2 हजार 800 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 605 रुपये ते 2 हजार 200 रुपये तर तीन नंबरचा कांदा 200 ते 1 हजार 600 रुपये भावाने विकला गेला. गोल्टी कांद्याला 1 हजार 300 रुपये ते 1 हजार 800 रुपये भाव मिळाला.अपवादात्मक 53 गोण्यांना 3 हजार 100 रुपये, 30 गोण्यांना 3 हजार रुपये तर 7 गोण्यांना 2 हजार 900 रुपये भाव मिळाला.

भुसार - बाजरी 1 हजार 750 रुपये ते 2 हजार 175 रुपये, गहू 2 हजार 352 रुपये, ते 2 हजार 900 रुपये, तूर 6 हजार 100 रुपये ते 6 हजार 555 रुपये तर सोयाबीन 5 हजार रुपये ते 5 हजार 351 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com