वांबोरीत कांद्याला 1800 रुपये भाव

वांबोरीत कांद्याला 1800 रुपये भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात कांद्याला उच्चतम 1 हजार 800 रुपये तर सोयाबीनला 6 हजार 806 रुपये भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. बाजार समितीच्या वांबोरी बाजारात एकूण 7 हजार 532 कांदा गोण्यांची आवक होऊन एक नंबर कांदा 1 हजार 100 ते 1 हजार 500, दोन नंबर कांदा 800 ते 1 हजार 95, तीन नंबर कांदा 600 ते 785 रुपये भावाने विकला गेला.

तर गोल्टी कांद्याला 600 ते 1हजार रुपये भाव मिळाला. 1 हजार 800 रुपये प्रमाणे 67 गोण्या, 1 हजार 733 रुपये प्रमाणे 33 गोण्या तर 1 हजार 600 रुपये प्रमाणे 65 गोण्या असा काही गोण्यांना अपवादात्मक भाव मिळाले. भुसार मालात बाजरी 2 हजार रुपये, गहू 1 हजार 800 ते 2 हजार 200, हरभरा 4 हजार 100, सोयाबीन 4 हजार 700 ते 6 हजार 806, भुईमूग शेंगा 4 हजार ते 4 हजार 500 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com