वांबोरीत कांदा 3500 रुपयांपर्यंत

कांदा
कांदा

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

काल सोमवारी वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात 18 हजार 672 कांदा गोण्याची आवक झाली. भाव जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपयांपर्यंत निघाले.एक नंबरचा गावरान कांदा 2 हजार 505 ते 3 हजार 200 रुपये, दोन नंबरचा कांदा 2 हजार 5 ते 2 हजार 500 रुपये तर तीन नंबरचा कांदा 300 ते 2 हजार रुपये भावाने विकला गेला.

तसेच गोल्टी कांद्याला 1 हजार 800 ते 2 हजार 300 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 112 कांदा गोण्यांना 3 हजार 500 रुपये, 22 कांदा गोण्यांना 3 हजार 400 रुपये तर 57 कांदा गोण्यांना 3 हजार 300 रुपये भाव मिळाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com