वांबोरीत बिबट्याच्या हल्ल्यात तरूण थोडक्यात बचावला

वांबोरीत बिबट्याच्या हल्ल्यात तरूण थोडक्यात बचावला

उंबरे |वार्ताहर|Umbare

काल संध्याकाळी साडेसात वाजता विकास संभाजी गडाख राहणार गडाख वस्ती, कुक्कडवेढे रोड वांबोरी हा घराकडे जात असताना बिबट्या शेतामध्ये दबा धरून बसला होता. बिबट्याने विकासला पाहताच त्याच्यावर झडप घेतली. यामध्ये तो गाडीवरून खाली पडला. विकासने आरडाओरड करत हातवारे केले. त्यामुळे बिबट्या तिथून निघून गेला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

हा प्रकार वनखात्याला कळविल्यावर त्यांनी पिंजरा घेऊन जा, पिंजरा गावातच आहे व त्या ठिकाणी ठेवून द्या, असे उत्तर दिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. मागील दोन महिन्यापासून बिबट्या सतत गडाख वस्ती शिवारात दिसत आहे. शेळ्या, कुत्रे फस्त करत आहे. आता माणसांवर हल्ला केल्यामुळे तो नरभक्षक झाल्याची शक्यता आहे. तरीसुद्धा वनखात्याची ठोस अशी कारवाई नाही.

पिंजरा मोकळा ठेवल्यामुळे त्यात बिबट्या जात नाही. शेतकर्‍यांनीच बिबट्यासाठी पिंजर्‍यामध्ये भक्ष ठेवावे, असे वनखात्याकडून सांगितले जाते. गडाख वस्ती परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com