वांबोरीतील ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवा

ग्रामस्थांचे उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना साकडे
वांबोरीतील ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवा

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील वांबोरी बाजारपेठ गावठाण हद्दीतील सर्व ट्रान्सफार्मर ओव्हरलोड झाले असल्याने बाजारपेठेतील

दुकानदार व रहिवाशांना सतत विजेचा लपंडाव सहन करावा लागत आहे. वांबोरी गावातील या सर्व ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवून द्यावी किंवा नवीन जादा ट्रान्सफार्मर बसवून देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी ग्रामस्थांसह ना. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे.

याबाबत नामदार तनपुरे यांनी त्वरित महावितरणच्या अधिकार्‍यांना सूचना देऊन संबंधित काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. बाबासाहेब भिटे म्हणाले, मुळा-प्रवरा वीज संस्था असताना वांबोरी गावठाण अंतर्गत अर्चना डीपी, पारख डीपी, रामदेव बाबा डीपी, बाजारतळ डीपी या पद्धतीने नवीन ट्रान्सफॉर्मर बसविले गेले.

परंतु सध्या या ट्रान्सफॉर्मरवर एकूण 1775 ग्राहक आहेत. घरगुती वापर, व्यापारी, बाजारपेठेतील दुकानदारांचा वापर तसेच मोठी दुकाने झाल्याने त्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे सर्व ट्रान्सफार्मर ओव्हरलोड झालेले दिसत आहेत व त्यातून कायमच वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आता आमदार आपले असून आपल्याकडेच उर्जामंत्रिपदाचा कार्यभार असल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

तरी याबाबत त्वरित कार्यवाही होऊन नवीन जास्त ट्रान्सफॉर्मर बसवून देऊन व्यापारीपेठ व जनतेची अडचण दूर करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी ना. तनपुरे यांच्याकडे केली.

यावेळी पांडुरंग मोरे, अनिल पठारे, सचिन साळुंखे, संकेत पाटील, विकास दगलबाज, लक्ष्मण कुसळकर, सचिन गायकवाड, पिराजी धनवडे, उमेश कुसमुडे, देवीदास धनवडे आदींसह वीजग्राहक, ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com