वांबोरी ग्रामपंचायतीत राजकारण आणू नका

कुटुंबियांना पदावर राहून काम करू द्या; तनपुरे यांचे आवाहन
वांबोरी ग्रामपंचायतीत राजकारण आणू नका

उंबरे |वार्ताहर| Umbare

माझी बायको दहा वर्षं राहुरी नगरपालिकेची नगराध्यक्ष असताना मी राहुरी नगरपालिकेच्या कार्यालयात कधी पायही ठेवला नाही, असा मार्मिक टोला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांचे नाव न घेता खासदार प्रसादराव तनपुरे यांनी मारला. त्याचप्रमाणे वांबोरी ग्रामपंचायतीत राजकारण न आणता आपल्या कुटुंबियांना पदावर राहून काम करू द्यावे असे आवाहन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले.

माजी खासदार तनपुरे शुक्रवारी वांबोरी ग्रामपंचायत मध्ये आले होते. येथील ग्रामीण रुग्णालयात होत असलेल्या लसीकरणामध्ये सातत्याने गोंधळ सुरू असून हा गोंधळ मिटावा व लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीसाठी सरपंच किरण ससाणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, प्राध्यापक शामराव पटारे, उत्तमराव पटारे, मेजर कृष्णा पटारे, अ‍ॅड. ऋषिकेश मोरे, बंडू पटारे, विलास गुंजाळ, ईश्वर कुसमुडे, ग्रामविकास अधिकारी बी. के. गागरे, कामगार तलाठी सतीश पडळकर, डॉ. अंजली मंडलिक आदी उपस्थित होते.

सध्या संपूर्ण देशात उद्भवलेल्या या करोना महामारी च्या काळात शासनस्तरावरून सुरू असलेले लसीकरण व्यवस्थित होणे गरजेचे असून वांबोरी ग्रामपंचायत व ग्रामीण रुग्णालय वांबोरी या दोन्हींचा समन्वय साधून लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून गावातील सर्वांना प्रभागनिहाय मतदार यादीच्या अनुक्रमांकानुसार लसीकरण करण्यासाठी प्राधान्य द्यावे, वांबोरी गावातील एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहिला नाही पाहिजे, अशी सूचना यावेळी माजी खासदार तनपुरे यांनी केली. तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी कन्या विद्यालयात शिक्षकांमार्फत रजिस्ट्रेशनची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याच्या यावेळी सूचना त्यांनी दिल्या.

ते म्हणाले, वांबोरी तीस हजार लोकसंख्येचे गाव असून शासनाकडून मिळणारे लसीचे ढोस हे अतिशय कमी येत आहेत. ते वाढविण्यासाठी जिल्हा अधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी विशेष नियोजन करणे गरजेचे असून लसीकरणाचा या कार्यक्रमामध्ये कोणीही वशिलेबाजी व हस्तक्षेप करून लसीकरणाच्या कामामध्ये अडथळा आणू नये असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, तसेच वांबोरी ग्रामपंचायतीचा कारभार करताना सर्वानी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. माझी बायको राहुरीची नगराध्यक्षपदावर असतांना मी तिच्या कामात कधीही लक्ष दिले नाही, असेही त्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com