उंबरे (वार्ताहर) -

राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात ग्रामपंचायत मालकीच्या एकूण 10 गाळ्यांची लिलाव प्रक्रिया काल दुपारी

पार पडली. यात एकूण 10 गाळ्यांच्या लिलावाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला 1 कोटी 65 लाख 11 हजार रुपये मिळाले.

ग्रामपंचायत कार्यालयासमोर मुख्यचौकात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्व.रामनाथ वाघ शॉपिंग सेंटरमधील एकूण 10 गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेत स्थानिक रहिवासी असलेल्या एकूण 74 ग्रामस्थांनी गाळा खरेदीसाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांची अनामत रक्कम भरून सहभाग घेतला. यावेळी सर्वाधिक 19 लाख 50 हजार रुपये बोली ठरली. तर सर्वात कमी 14 लाख 51 हजार रुपये बोली ठरली.

यावेळी सरपंच किरण ससाणे, उपसरपंच मंदाताई भिटे, राहुरी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद परदेशी, शाखा अभियंता ए.आर पाटील, विस्ताराधिकारी बापूसाहेब फुगारे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब गागरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचार्यांनी सहकार्य करत लिलाव प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

गत दोनवर्षापूर्वी ज्येष्ठ नेते सुभाष पाटील व डॉ. तनपुरे सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनखाली या शॉपिंग सेंटरचे बांधकाम तत्कालीन सदस्य मंडळाने केले होते. वांबोरी ग्रामपंचायत समोर बांधण्यात आलेले गाळे जिल्हा परिषद सदस्या सौ. शशिकलाताई पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा ग्रामीण विकास निधी अंतर्गत 45 लाख रुपये कर्ज उपलब्ध करण्यात आले. तर ग्रामपंचायत फंडातून सत्तावीस लाख रुपये उपलब्ध करून हे गाळे बांधण्यात आले आहेत.

- किरण ससाणे, सरपंच, वांबोरी.