File Photo
File Photo

वांबोरीत वीजचोरी उघडकीस; दोघांवर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

विजबील कमी येण्यासाठी विजमीटरमध्ये (Electricity Meter) छेडछाड करून विजेची चोरी (Electricity Theft) करण्यात आली. हा प्रकार राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) वांबोरी (Vambori) येथे घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) विजचोरी करणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

महावितरणमधील कर्मचारी प्रदीप राधेश्याम सावंत यांनी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 9 जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास यातील दोन आरोपींनी महावितरण कंपनीच्या विजमिटरमध्ये (Electricity Meter) वीज वापरायची नोंद विजमिटरमध्ये कमी प्रमाणात होईल. अशी कायमस्वरूपी व्यवस्था करून विजचोरी (Electricity Theft) केल्याने उघडकीस आले आहे.

महावितरण कर्मचारी प्रदीप सावंत यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात (Rahuri Police) आरोपी नवनाथ भानुदास कल्हापुरे व भाऊसाहेब भानुदास कल्हापुरे दोघे रा. वांबोरी, ता. राहुरी या दोघांवर गुन्हा रजि. नं. 585/2022 भारतीय विद्युत अधिनियम कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार साईनाथ टेमकर हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com