वांबोरीत क्रिकेटच्या वादातून कैतीने सपासप वार

दोन जण जखमी
वांबोरीत क्रिकेटच्या वादातून कैतीने
सपासप वार

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे क्रिकेटच्या वादातून दोघांवर कैतीने वार करून गंभीर जखमी केली आहे. जखमींना नगर येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पोस्ट ऑफिस समोर काल दुपारी 3.30 च्या दरम्यान क्रिकेट खेळत असताना नकुल अरुण कल्हापुरे (वय 16), ऋषिकेश अरुण कल्हापुरे (वय 19) व कोरडे नामक तरुण हे क्रिकेट खेळत होते. नकुल कल्हापुरे यांनी दिलेल्या जबाब म्हटले आहे की, मी बॅट हातात घेऊन क्रिकेट खेळण्यासाठी उभा होतो. यावेळी कोरडे याने सांगितले की पहिला डाव माझा आहे. माझ्या हातात बॅट दे आणि तू बॉल टाक असे म्हटल्यानंतर वादावादी झाली. या चकमकीत कोरडे यांचा राग अनावर झाला त्यांनी लगेच आपल्या घरी जाऊन स्कुटी गाडीवर आला त्यावेळी तो धारदार हत्यार कैती घेऊन आला. कल्हापुरे हे दोघे भाऊ आपल्या घरी जात असताना कोरडे यांनी त्यांच्या अंगावर सपासप वार केले व पुन्हा कैती घेऊन त्या ठिकाणाहून पळुन जात असताना त्या ठिकाणी असणारे कल्हापुरे बंधू यांच्या महिलांनी कोरडे यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी कोरडे यांच्याकडून गाडी खाली पडली व ते त्या ठिकाणी गाडी सोडून पळून गेले. या दोन्ही बंधूंना धारदार शस्त्राने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. अशाच अवस्थेमध्ये त्यांना प्राथमिक उपचारासाठी गावातील दावाखान्यात आणले होते. परंतु धारदार शास्त्राचे वार असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यावेळी त्यांना ताबडतोब नगर येथे उपचारासाठी खाजगी वाहनातून हलवण्यात आले.

या घटनेची संपूर्ण माहिती पोलीस निरीक्षक मेघराज डांगे यांना समजतात त्यांनी पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे पोलीस हे कॉ दिनकर चव्हाण संतोषकुमार राठोड यांना सदर घटनेची माहिती देऊन घटनास्थळी पाठविण्यात आले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून स्कुटी, धारदार शस्त्र ताब्यात घेतले. यावेळी शोधाशोध घेतला असता कोरडेस पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वांबोरी ठिकाणी अशी घटना घडल्यामुळे काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे या ठिकाणचे वातावरण निवळले आहे. जखमी अवस्थेत असलेले कल्हापुरे बंधू यांना नगर येथे हलविले. रात्री पोलिसांनी कल्हापुरे बंधुंचे जबाब घेतले.

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची नुकतीच नगर येथे बदली झाल्यामुळे पुन्हा गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या नऊ दहा महिन्यांमध्ये राहुरी तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था अतिशय चोखपणे राबविण्यात आली होती. भुरट्या चोर्‍या मोटरसायकल, मोबाईल चोर, छेडछाडी करणारे व काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असणार्‍यानां पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांनी चांगलीच चपराक दिली होती. त्यामुळे राहुरी तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख कमी झाला होता. पुन्हा दराडे यांची बदली होताच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोकं वर काढू पहात आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com