वाळवणे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वाळवणे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर तालुक्यातील वाळवणे येथे दिगंबर शिंदे या तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. याबाबत युवराज गुलाब शिंदे यांनी सुपा पोलीस स्टेशनला माहिती दिली.

दिगंबर शिंदे याने बुधवार (16 जून) रात्री 11.00 ते गुरुवारच्या पहाटे दरम्यान वाळवणे येथील घराच्या समोरील चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. युवराज शिंदे यांच्या माहितीवरून पोलीस हेड कॉन्स्टेबल कुटे सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

युवराज शिंदे यांच्या फिर्यादीवरून प्रथमदर्शनी सुपा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल एस. एन. कुटे पुढील तपास करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com