वळण गाव पाच दिवस बंद

वळण गाव पाच दिवस बंद

वळण (वार्ताहर) - राहुरी तालुक्यातील वळण येथे करोना महामारी रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यास गावाने देखील सर्वानुमते प्रतिसाद दिला आहे.

करोना दक्षता समितीने रोड वरून थांबून येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना ज्या नागरिकांना मास्क नाही, त्यांना मास्क देऊन त्यांना हात जोडून विनंती केली. यावेळी समितीचे सदस्य कामगार पोलीस पाटील, सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ तात्या खुळे, ग्रामसेवक राठोड, फकीरचंद फुणगे, ग्रामपंचायतचे कर्मचारी रोहिदास रंधे, पत्रकार वसंत आढाव, तसेच करोना समितीच्या वतीने सर्व दुकानावर नोटिसा चिटकविण्यात आल्या.

उपसरपंच एकनाथराव खुळे म्हणाले, सध्या हा रोग ग्रामीण भागामध्ये जास्त जोर करीत आहे. त्याकरीता सर्व नागरिकांनी व ग्रामस्थांनी नियमाचं पालन करावे. सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा, अशी विनंती केली. राठोड म्हणाले, यापुढे विना मास्क आढळल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पोलीस पाटील सोमनाथ डमाळे म्हणाले, वळण येथील ग्रामस्थांनी नियमाचं पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com