वळणला अज्ञातांनी पाच एकर हरभरा पेटवून दिला

वळणला अज्ञातांनी पाच एकर हरभरा पेटवून दिला

शेतकर्‍याचे तीन लाखाचे नुकसान

वळण |वार्ताहर| Valan

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) वळण (Valan) येथे शनिवारी रात्री आठच्या दरम्यान पोपटराव भाऊसाहेब खुळे यांच्या शेतातील सोंगून गोळा करून एकाठिकाणी गंज करून काढणीसाठी ठेवलेला पाच एकर हरभरा (Gram) कोणीतरी अज्ञात इसमाने पेटवून (Set on fire) दिला. त्यामुळे खुळे यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान (Loss) झाले आहे. या घटनेमुळे शेतकर्‍यांनी हळहळ व्यक्त केली असून नुकसान भरपाई देण्याची मागणी (Demand for Compensation) केली आहे.

पाच एकर हरभर्‍याच्या (Gram) गंजीचा वार्‍याच्या झोतामुळे वणवा भडकला. त्यात संपूर्ण काढणी केलेला हरभरा (Gram) जळून खाक झाला. खुळे यांची वळण ते राहुरी कारखाना (Rahuri Factory) रोडवर शेती आहे. गावापासून वस्ती चार किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तेथे ग्रामस्थ जाईपयर्ंत हरभर्‍याची अक्षरशः राखरांगोळी झाली. यामुळे खुळे यांच्यावर मोठा आर्थिक आघात झाला. जा घटनेचा मानोरी (Manori) येथील तलाठी प्रवीण जाधव यांनी पंचानामा केला असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशनला (Rahuri Police Station) धीरज खुळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

काढणी केलल्या हरभर्‍याचा शेतीच्या मध्यभागी मोठा गंज केला होता. तोच गंज नेमका पेटला. विशेष म्हणजे या शेतामध्ये कोठेही विजेचा एक खांब देखील नाही. त्यामुळे शॉर्टसर्किटने आग लागली नसल्याचे स्पष्ट झाले. रस्त्यापासून हरभर्‍याचा गंज जवळ-जवळ हजार ते पंधराशे फूट एवढा मध्यभागी ठेवण्यात आला होता. त्यामुळे जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा केला असल्याची उलटसुलट चर्चा चालू आहे.

Related Stories

No stories found.