वळण सोसायटी निवडणुकीत दुरंगी लढत !

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी प्रयत्नशील
वळण सोसायटी निवडणुकीत दुरंगी लढत !

वळण |वार्ताहर| Valan

राहुरी तालुक्यातील वळण येथील विविध सहकारी सेवा संस्थांच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सुरुवातीपासून मोठी उत्कंठा लागलेल्या सोसायटी निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. परंतु विरोधकांमध्ये काहीशी मरगळ आल्याने सत्ताधारी हे निवडणूक बिनविरोध करायच्या तयारीला लागले असल्याची चर्चा आहे.

13 संचालक मंडळाच्या निवडीसाठी सर्वसाधारण खातेदार कर्जदारामधून 8 प्रतिनिधी, अनुसूचित जाती जमाती 1 प्रतिनिधी, महिला 2 प्रतिनिधी, इतर मागास 1 प्रतिनिधी, भटक्या विमुक्त जातीजमाती, विषेश मागास 1 प्रतिनिधी अशा 13 संचालक मंडळाच्या निवडीसाठी ही निवडणूक होणार आहे. 6 ते 12 मे दरम्यान उमेद्वारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 13 मे रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. 17 मे रोजी नामनिर्देशित पत्रांची सूची जाहीर करण्यात येईल. 31 मे पर्यंत उमेद्वारी अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. 1 जून रोजी चिन्ह वाटप करून 12 जून रोजी मतदान होणार व सायंकाळपर्यंत निकाल घोषित करण्यात येईल.

त्यामुळे आता अर्ज भरण्यासाठी केवळ काही दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने दोन्ही मंडळांकडून उमेद्वारांची चाचपणी सुरू करण्यात आली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान सत्ताधार्‍यांकडून बहुतांशी संचालकांना पुनर्संधी देण्याचे ठरले आहे. तर काही संचालकांना डच्चू देऊन खांदेपालट करणार असल्याचे देखील बोलले जात आहे. दुसरीकडे मात्र, विरोधकांमधेही फारसे अलबेल नसल्याने याचा फायदा सत्ताधार्‍यांना होऊ शकतो. त्यामुळे विरोधक सत्ताधार्‍यांच्या विरोधातील सर्व नाराज गटांची एकजूट करून त्यांचा सामना करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यामधे त्यांना किती यश मिळते? हे बघणं औचित्याचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com