
वळण |वार्ताहर| Valan
राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) वळण (Valan) शिवारामध्ये एका विहिरीत (Well) काळवीट (Antelope) पडून त्यामध्ये त्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी वनविभागाचे 9Forest Department) कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी मृत काळविटास ताब्यात घेतले आहे.
वळण-पाथरे रस्ता (Valan-Pathare Road) शिवारातील विजय शेळके यांच्या शेती गट नंबर 219 मधील एका विहिरीमध्ये हे मृत काळवीट (Antelope) पाण्यात तरंगताना आढळून आले. येथील शेतकरी विजय शेळके यांनी हे बघितले असता गणेश आढाव, सुनील शेळके आदि शेतकर्यांच्या मदतीने या मृत काळवीटाला (Antelope) वर काढण्यात आले.
वनविभागाचे अधिक कर्मचारी वनरक्षक सतीश जाधव, महादेव शेळके यांना घटनेची माहिती दिल्यानंतर या ठिकाणी वन विभाग (Forest Department)दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करून मृत काळवीटास (Antelope) ताब्यात घेण्यात आले आहे. मृत काळविटेचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार केला जाईल अशी माहिती वन विभागातने दिली आहे.