वळदगावात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

बेलापुरातहीे खाजगी वीज कामगार गंभीर जखमी
वळदगावात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील वळदगाव येथे एका तरुणाचा विजेचा शॉक बसल्याने मृत्यू झाला आहे. तर दुसर्‍या घटनेत बेलापूर येथे विजेच्या पोलवर काम करत असताना विजेचा धक्का लागून एक खासगी कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्यास तातडीने साखर कामगार रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील वळदगाव येथील जावेद गुलाब शेख या तरुणास विजेचा शॉक बसला असता त्यास उपचारासाठी तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्याचा उपचारापर्वूीच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

याप्रकरणी साखर कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालावरुन श्रीरामपूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री. हापसे हे पुढील तपास करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com