वाकडीत विहिरीत आढळला शेतकर्‍याचा मृतदेह

वाकडीत विहिरीत आढळला शेतकर्‍याचा मृतदेह

वाकडी |वार्ताहर| Vakadi

राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथे गोटेवाडी भागात राहणार्‍या तरूण शेतकर्‍याचा गट नं- 811 मधील विहिरीत मृतदेह आढल्याने खळबळ उडाली आहे.

वाकडी येथील रहिवासी राजेंद्र आण्णासाहेब लहारे (वय 45) हे दि. 9 जून रोजी रात्री शेतात विद्युत पंप चालू करावयास गेले ते घरी परतलेच नाही. तेव्हा पासून ते गायब होते. दोन दिवस परिसरात नातेवाईकांनी शोधाशोध केली. मात्र कुठेही तपास लागला नाही. दि. 10 रोजी दुपारी येथील तरुण शिवाजी भालेराव, मिननाथ लहारे, दिलीप भालेराव, डॉ. सुनील भालेराव हे शोध घेत असताना राजेंद्र लहारे यांच्याच मालकीच्या विहिरीत मृतदेह असल्याचे निदर्शनास आले.

खात्री केल्यानंतर संदीप लहारे यांच्याशी संपर्क साधत माहिती दिली. त्यांनी तात्काळ श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे माहिती दिल्याने पो. नि. श्री. साळवे, हेड कॉ. आडांगळे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह तळाशी असल्यामुळे बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

याबाबत दि. 9 रोजी श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे हरवल्याची तक्रार दाखल केली होती. घटनेची माहिती मिळताच सरपंच डॉ. संपतराव शेळके हे देखील घटनास्थळी हजर झाले. राजेंद्र हे मुळा-प्रवरा प्रवरा वीज संस्थेत वायरमन म्हणून काम करत होते. संस्थेचे हस्तांतरण झाल्यानंतर त्यांनी दुध व्यवसाय व शेती व्यवसाय अगदी व्यवस्थित चालु होता.

त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी श्रीरामपुर ग्रामीण पोलिस स्टेशन येथे अकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड. कॉ. आडांगळे करत आहे. शवविच्छेदन करुन सायंकाळी वाकडी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com