
वैजापूर | प्रतिनिधी
ग्रामीण भागांतील अपुऱ्या सुविधांमुळे वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेची तेथील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणा व चुकीच्या मार्गदर्शनामुळे वाहनामध्येच प्रसुती झाल्याने उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
वैजापूर तालुक्यातील लोणी खु येथील महिला रिजवाना शाकीर पठाण राहणार वडजी या महिलेला रविवारी पहाटे पाच वाजता प्रस्तुती कळा येत असल्याने सदरील महिलेला लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
या महिलेस तपासणी करून पुढील प्रसूतीसाठी वैजापूर जिल्हा उप रुग्णालय येथे पाठवण्यात आले व त्या महिलेस सकाळी ६.३० वाजता ऍडमिट करण्यात आले व सदरील महिलेस सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्या महेलेस कोणतेही उपचार हे करण्यात नाही आले.
सायंकाळी सदर महिलेस सांगण्यात आले की, आपली प्रसूती नॉर्मल होणार नसून त्या महिलेचे सिजर करण्यासाठी आपणास औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागेल असे सांगून सदर उपजिल्हा रुग्णालयात 108 चे दोन वाहने असून सुद्धा त्यांनी 102 हे प्रायव्हेट वाहनाने सदर महेलेस पाठवण्यात आले.
या वाहनात कोणतेही सुविधा नसून कोणताही कर्मचारी किंवा नर्सेस या वाहनामध्ये पाठवण्यात आली नसून बाळंतनीस वीस मिनिटाच्या आत गंगापूर जवळजवळ जास्त त्रास होऊ लागल्याने सदर महिलेची या वाहनांमध्येच प्रसूती झाली. या वाहनामध्ये ही प्रस्तुती मुलीच्या नातेवाईकांनी केली.
सदर वाहन औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात नेले असता. सदर पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरला बाळाची नाळ कापण्यासाठी गाडीमध्ये बोलवण्याची वारंवार विनंती करूनही डॉक्टरने टाळाटाळ करण्यात आली. सदर बाळंतनीस खूप हाल शोषण्यात आले. संबंधित वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातील एमओ व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी संबंधित नातेवाईकांनी केली आहे.