रातोरात उपविभागीय कार्यालयाचे पालटले रुप !

रातोरात उपविभागीय कार्यालयाचे पालटले रुप !

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांच्या कार्यालय भेट दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर येथील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाचे महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचार्‍यांनी डोळ्यात तेल घालून रातोरात उपविभागीय अधिकारी कार्यालयाला देखणे लूक बहाल करण्याची चोख कामगिरी केली.

रातोरात उपविभागीय कार्यालयाचे पालटले रुप !
दलालांना पैसे देऊन भारतात आलेले चार बांगलादेशी पकडले

वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कार्यालय स्वच्छतेविषयी कानउघडणी टाळण्यासाठी कार्यालयातील विविध विभागाचा कानाकोपरा ते आवारातील मोकळे पटांगणाची सकाळी काळजीपूर्वक झाडलोट चकचकीत केले होते. विभागीय आयुक्तांच्या स्वागतासाठी कार्यालयात आकर्षक ग्रीन कार्पेट टाकण्यात आले होते. जागोजागी शोभिवंत झाडांच्या कुंड्या ठेवून परिसर अधिकाअधिक सुशोभीत ठेवण्याचा प्रयत्न यंत्रणेने केला होता.

रातोरात उपविभागीय कार्यालयाचे पालटले रुप !
ईश्वर प्राप्तीसाठी भक्ती हेच साधन- महंत रामगिरी महाराज

कार्यालयात कामासाठी बाहेर बसणार्‍या लोकांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुसज्ज प्रतिक्षा दालन उभारण्यात आले होते. त्याठिकाणी बसण्यासाठी आरामदायी सोफासेट, विरंगुळ्यासाठी खास टिव्ही संच अशा कधी नव्हे त्या अद्यवायत सुविधा येथे उपलब्ध करुन दिल्यामुळे शासकीय कामासाठी कार्यालयात येणारे लोक कार्यालयाचा बदललेला थाटमाट पाहून बुचकळ्यात पडले होते.

रातोरात उपविभागीय कार्यालयाचे पालटले रुप !
पत्नीला अंधारात ठेवून दुसर्‍यांदा बोहल्यावर चढण्याचा प्रयत्न

परिसरात आलेल्या लोकांनी इकडे तिकडे बसू नये याकरिता कर्मचारी त्यांना प्रतिक्षा दालनात बसण्याचा आग्रह यंत्रणेतील कर्मचारी मोठ्या अदबीने करत असल्याचे चित्र येथे दिसून आले. दरम्यान उपविभागीय कार्यालयातील विभागीय आयुक्त यांच्या दौर्‍या निमित उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा कायमस्वरुपी याठिकाणी नागरिकांसाठी कार्यान्वित राहतील का याविषयी मात्र अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत.

रातोरात उपविभागीय कार्यालयाचे पालटले रुप !
भावाच्या आजारपणाचा फायदा घेत बहिणीने लाटले 35 लाख

उपअभियंत्यांना सुशोभिकरण कामांचा पत्ता नाही...

उपविभागीय अधिकारी कार्यालयात युध्दपातळीवर कार्यालय परिसर नीटनेटके व वाहने शिस्तीत उभे करण्यासाठी तारेचे कुंपण घालून तयार केलेले वाहनतळ तसेच कार्यालयात उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयामार्फत करुन दिल्या जात आहेत का? यासंदर्भात उपअभियंता अजित रोडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला याविषयी काही कल्पना नाही. माहिती घेऊन कळवतो अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे प्रशासनातील अधिकारी याठिकाणी कोणत्या सामाजिक फंडातून कार्यालयाचे भाग्य उजळवण्याचा प्रयत्न करीत आहेत हा संशोधनाचा विषय बनला आहे.

रातोरात उपविभागीय कार्यालयाचे पालटले रुप !
कांदा व टोमॅटोचे वाचा भाव
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com