
वैजापूर | प्रतिनिधी
वैजापूरचे शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता भरती झालेल्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचारासाठी (रेफर) हलवण्याची बेजबाबदार कृती केल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालयातील १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्याची कारवाई केली.
तसेच रुग्णालयात वैद्यकीय अधिका-यांनी कर्तव्य बजावताना अकार्यक्षमता, दाखवल्यास रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांना त्यासाठी जबाबदार धरुन त्याच्या मसिक वेतनातून आर्थिक रक्कम कपात करण्याचा इशारा वरिष्ठ अधिका-यांनी दिल्याचे समोर आले.
सात डिसेंबरला दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैजापूरचे उपजिल्हा रुग्णालयाला सरप्राईज भेट देऊन विविध आरोग्य कक्षातील कामकाजाची बारकाईने तपासणी केली. त्यात नोव्हेंबर महिन्यात प्रसृती विभागात दाखल झालेल्या २२ महिलांना दुसऱ्या रुग्णालयात प्रसुती साठी ( रेफर) हलवण्याचे कारवाई कर्तव्यावरील वैद्यकीय अधिका-यांनी केल्याचा गंभीर प्रकार आढळून आला.
रुग्णालयात आरोग्य सेवा उपलब्ध असताना रुग्णांना रेफर करुन नि:सुटकेचा मोकळा श्वास घेणा-या १४ वैद्यकीय अधिका-यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या.
या डाँक्टरांना बजावल्या नोटीसा...
नोव्हेंबर महिन्यात उपजिल्हा रुग्णालयातून २२ रुग्णांना रेफर लेटर दिल्याबद्दल डॉ. निलिमा पालवे, डॉ. सुधाकर मुंढे, डॉ. रिजवान शेख, डॉ. सोहेल शेख, डॉ. दुर्गा पाटील, डॉ. कविता गायकवाड, डॉ. शिवाजी भिसे, डॉ. शाकेब सौदागर, डॉ. सुधीर गिते, डॉ. शुभांगी गिते, डॉ. आशिष पाटणी, डॉ. योगेश राजपूत, डॉ. यशपाल चंदे, डॉ. निलेश आंदळकर यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन तारपे यांनी सांगितले.
प्रसृती विभागात रुग्ण रेफरचे प्रमाण अधिक ..
उपजिल्हा रुग्णालयात नोव्हेंबर महिन्यात महिला प्रसृती कक्षात दाखल नोव्हेंबर महिन्यात १०० महिला प्रसृतीसाठी दाखल झाल्या होत्या.त्यापैकी २२ महिलांना इतरत्र प्रसृतीसाठी जाण्याचा सल्ला वैद्यकीय अधिका-यांनी दिला होता.