गांजा ओढण्यासाठी गेले अन् पूजाऱ्याला ठार मारले !

वैजापूरच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
गांजा ओढण्यासाठी गेले अन् पूजाऱ्याला ठार मारले !

वैजापूर |ता. प्रतिनिधी|Vaijapur

पोलीस स्टेशन वैजापूर हद्दीत नारंगी- सारंगी धरणाच्या बाजुला गवळी बाबा यांच्या मंदिरात राहत असलेल्या पुज्या-याची निर्घृन हत्या करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले. गांजा पिण्यासाठी गेलेल्या तिघांचा पूजाऱ्याशी वाद झाला होता. या वादातून त्यांनी पूजाऱ्याला ठार मारल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शुभम गोरख पवार (रा. दुर्गा नगर वैजापूर), अजय दीपक पगारे (रा. म्हस्की चौफुली वैजापूर), समर्थ सुरेश मनोरे (रा. दुर्गानगर वैजापूर) अशी आरोपींची नावे आहेत.

दिनांक 10/12/2022 रोजी फिर्यादी गोपाल कैलास चव्हाण (रा. बुरुडगाव रोड जकात नाका, भागवत गिरणी जवळ अहमदनगर) यांनी पोलीस स्टेशन वैजापूर येथे तक्रार दिली की, त्यांचे वडिल कैलास गणपत चव्हाण (वय 52 वर्षे) हे मौजे वैजापूर शिवारात गवळी बाबा यांच्या मंदिरात मागील दीड वर्षा पासून राहत होते. ते कोठेही बाबा व महाराज लोकांसोबत राहत होते व त्यांना गांज्या पिण्याची सवय होती.

दिनांक 09/12/2022 रोजी रात्रीच्या 10.00 वाजता वैजापूर पोलीसांनी फोन करुन सांगीतले की, रात्री 04.10 वाजे पूर्वी तुमचे वडिल कैलास चव्हाण यांना नारंगी सारंगी धरणाच्या बाजुला असलेल्या गवळी बाबा मंदिराजवळ त्यांना कोणीतरी मारहाण केलेली आहे व त्यांच्या हाताला मार लागलेला आहे. त्यांचे मनगट तुटलेले आहे. या तक्रारी वरुन पोस्टे वैजापूर येथे गुन्हा झालेला आहे.

पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखाचे पथक गुन्हयाचा समांतर तपास करित असताना त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी शुभम गोरख पवार (रा. दुर्गा नगर वैजापुर), अजय दीपक पगारे (रा. म्हस्की चौफुली वैजापूर), समर्थ सुरेश मनोरे (रा. दुर्गानगर वैजापूर) यांनी केल्याची माहिती मिळाली.

ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीतांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. विचारपुस करता सर्व आरोपीतांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना विचारपुस करून अधिक माहिती घेतली असता आरोपीतांनी सांगितले की, आम्ही कैलास बाबा यांच्याकडे गांज्या पिण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा आमचा वाद झाल्याने त्यांना आम्ही तेथील दोन लाकडी काठ्यांनी मारहान करून त्यांना ठार मारले. असे सांगून गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. आरोपीतांना सदर गुन्हयाचे पुढील तपास कामी पोलीस ठाणे वैजापूर यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस स्टेशन वैजापूर करीत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक, सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी गंगापूर  प्रकाश बेले, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपुत, पोलीस उप निरीक्षक प्रदिप ठुबे, पोउपनि झिया, पोना दीपक सुरोशे, विजय धुमाळ, नरेंद्र खंदारे, पोकाँ आनंद घाटेश्वर, संतोष डमाळे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com