VIDEO : नागमठाण शिवारात आढळली बिबट्याची पिल्ले

VIDEO : नागमठाण शिवारात आढळली बिबट्याची पिल्ले
बिबट्या

वैजापूर | वार्ताहर

वैजापूर तालुक्यातील नागमठाण-जातेगाव शिवाराच्या हद्दीत रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ऊसाच्या शेतात बिबट्याची दोन पिल्ले आढळुन आली. त्यावरुन ऊसात बिबट्याची मादी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असुन परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या घटनेबाबत वनविभागाला कळवुनही कुठलीही कार्यवाही करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्व नाराजी पसरली आहे.

तालुक्यातील नागमठाण शिवारात माजी पंचायत समिती सदस्य नारायण विखे यांच्या शेताजवळ असलेल्या विठ्ठल साबे यांच्या गट क्रमांक १८२मधील ऊसाच्या शेतात नागरिकांना दोन बछडे खेळताना आढळुन आली. यावरुन ऊसाच्या शेतात मादी बिबट्या असण्याची दाट शक्यता आहे. या भागात यापुर्वी बिबट्याने हल्ला करुन शेतकऱ्यांना जखमी केल्याच्या घटना उघडकिस आल्या आहेत.

शेतकरी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जात असतांना बिबट्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना काही दिवसांपुर्वीच घडली होती. मात्र त्यानंतरही वनविभागाने या ठिकाणी भेट देऊन पिंजरा लावणे, नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला नाही. त्यामुळे वनविभागाबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. वनविभागाने तातडीने या ठिकाणी भेट देऊन हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.