Arrested अटक
Arrested अटक

वैजापुरात डिझेल चोरणार्‍या गणेशनगर येथील आरोपीस अटक

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

वैजापूर शहरात रात्रीच्यावेळी उभ्या असलेल्या ट्रकमधील डिझेल चोरणार्‍या चोरास काल अटक करण्यात आली आहे. कोपरगावच्या सबजेलमध्ये असलेल्या त्याच्या साथीदारासही पोलीस ताब्यात घेणार आहे.

वैजापूर येथील साई पार्क येथील अशोक सूर्यभान धुळे यांची ट्रक ही त्यांचे घरासमोर रोडवर रात्रीच्या वेळी उभी केलेली असताना काही अज्ञात चोरट्यांनी ट्रक मधील डिझेल चोरून नेले होते. त्यावरून पोलीस स्टेशन वैजापूर येथे गुरंन 21/2823 नुसार अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे हे करत आहेत.

तपास अधिकारी यांनी तपासाचे चक्र फिरवत त्यांनी त्यांचे माहितीगारांमार्फत माहिती प्राप्त करून घेतली की, योगेश तबाजी घोगळ राहणार गणेशनगर, ता. राहाता, जि. अहमदनगर व त्याचे साथीदार यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यावरून तपास अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे व मदतनीस महेश बिरुटे यांनी काल अचानक आरोपीच्या पत्त्यावर जाऊन योगेश तबाजी घोगळ रा. गणेश नगर, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर यास ताब्यात घेतले. तसेच त्याचा एक साथीदार आरोपी हा कोपरगाव सब जेल येथे असल्याची माहिती मिळालेली असून त्यास ही ताब्यात घेण्याची कार्यवाही करत आहोत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, उपविभाग वैजापूर व पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे व मदतनीस पोलीस अंमलदार महेश बिरुटे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com