
वैजापूर (प्रतिनिधी)
तालुक्यातील लासुरगाव येथे दोघांमध्ये आपआपसात वाद झाल्याने दगडाने छातीवर व डोक्यावर घाव घालत खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळीस उघडकीस आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की लासुरगाव येथे खून झाल्याची स्थानिक नागरिकांकडून वैजापूर पोलिसांना माहिती मिळताच वैजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
कृष्णा पोपटराव हरिश्चंद्रे वय 28 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खून झालेला व्यक्तीचा मृतदेह वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला असून या घटनेत संशयित म्हणून एका व्यक्तीस वैजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेबाबत अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत.