वैजापूरमध्ये भरदिवसा जबरी चोरी, ४ लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास

वैजापूरमध्ये भरदिवसा जबरी चोरी, ४ लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास

वैजापूर | वार्ताहर

वैजापूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शहरातील बन्सीलाल नगर येथे भरदिवसा चोरट्यांनी जबरी चोरी करत 4 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना काल (सोमवार) दुपारच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की विक्रम सदाशिव कदम (वय 44) हे घरी नसताना त्यांच्या घरी दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप लावलेला कोंडा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी कदम यांचा मुलगा घरी आला त्याला घराच्या दरवाजाला कुलूप लावून तो नुकताच गेला होता. त्याला आल्यावर दरवाजा उघडा दिसला.

वैजापूरमध्ये भरदिवसा जबरी चोरी, ४ लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास
MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

त्याला गडबड वाटल्याने त्याने प्रथम घरात आई आली असेल म्हणून आईला आवाज दिला. तितक्यात अज्ञात चोरटा अचानक त्याच्या अंगावर धाऊन हिसका देत त्या चोरट्याने त्याला पान्हा फेकुन मारला व चोरट्याने तेथून धूम ठोकली. इतक्यात त्याने घरासमोर असेल्या मित्राला चोर चोर आरोळी दिली. यावेळी त्याचा मित्र बाहेर आला व दोघांनी त्या चोराचा पाठलाग केला व 500 फुटाच्या अंतरावर त्याला गाठले.

परंतु त्या चोरट्यांचा पारख ठेऊन असलेल्या साथी दारासोबत चोरटा दुचाकी वरून पसार झाला. त्यांनी घटनेची माहिती आपले वडिलांना दिली. यावरून कदम यांनी तत्काळ पोलिसांना कळविले.

वैजापूरमध्ये भरदिवसा जबरी चोरी, ४ लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास
दाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरली! प्रसिद्ध अभिनेत्याने संपवलं आयुष्य, धक्कादायक कारण आले समोर

यावेळी घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी, वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सम्राट सिंह राजपुत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, योगेश झलटे, गणेश पैठणकर यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी पाहणी केली.

यावेळी अंगुली पथकाचे स.पोनी साबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय जाधव, श्वान पथकाचे पो.उप नी.मिलिंद कुलकर्णी, सहाय्यक फौजदार विकास तळेकर यांनी देखील पाहणी केली. यावेळी चोरट्यांनी कदम यांच्या घरातील ठेवलेले ३ लाख ९८ हजार रुपये रोख व दीड तोळे सोने असा एकूण ४ लाख ४३ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे समोर आले.

वैजापूरमध्ये भरदिवसा जबरी चोरी, ४ लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास
राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेले

या प्रकरणी वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल झालेला असून प्रकरणी पुढील तपास वैजापूर पोलीस करीत आहे भरदिवसा झालेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वैजापूरमध्ये भरदिवसा जबरी चोरी, ४ लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास
सुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? पुत्रप्राप्तीसाठी महिलेला खाऊ घातली मानवी हाडांची राख
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com