
वैजापूर | वार्ताहर
शिऊर पोलिसांनी अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकास वडजी भागात अटक करत एकूण 1 लाख 74 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम वडजी शिवारात अवैध रित्या देशी दारूची वाहतूक करणार आहे. या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी वडजी शिवारात सापळा रचून एकास अटक केली आहे.
शुभम शायरी चव्हाण (रा कोपरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मारुती 800 गाडी व देशी दारूचे 26 बॉक्स असा एकूण 1 लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शिऊर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अटक केलेल्या व्यक्तीवर या अगोदरही दारू अवैध वाहतुकीचे गुन्हे दाखल आहे. विशेष बाब म्हणजे शिऊर पोलिसांच्या हद्दीत या अगोदरही या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईने अवैध धंदे खपून घेतले जाणार नाही असा अप्रत्यक्ष संदेश शिऊर पोलिसांकडून देण्यात आला आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक, गणेश गोरक्ष, विशाल पैठणकर, गणेश जाधव यांनी केली.