ठोंबरे काका-पुतण्याच्या अखेर राष्ट्रवादीत प्रवेश

ठोंबरे काका-पुतण्याच्या अखेर राष्ट्रवादीत प्रवेश

वैजापूर | वार्ताहर

औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते भाऊसाहेब काका ठोंबरे, नगरसेवक विजय ठोंबरे व जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे यांचा बहु प्रतिक्षित प्रवेश आज महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई येथे आज पार पडला.

याप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की, पंकज ठोंबरे व त्यांच्या सर्व समर्थकांचा पक्ष प्रवेश बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता. अनेकदा बऱ्याच वेळा या विषयावर चर्चा देखील झाली. अडचणीच्या काळात त्या सर्वांनी त्यांचा विचार ढळू न देता संयम ठेवला साहेबांच्या विचारावर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवत आजच्या दिवसाच्या वाट बघितली त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. औरंगाबाद जिल्हा नेहमीच साहेबांवर विश्वास ठेवणारा जिल्हा आहे. पण आज परिस्थिती थोडी वेगळी आहे. त्यामुळे तुम्हाला अजुन खुप काम करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच काम करणाऱ्या माणसाला प्राधान्य देतो. ज्याच्यात कर्तृत्व असेल नेतृत्व असेल अशा माणसांना इथ प्राधान्य असतं. त्यामुळे तुम्ही काम करा मी तुमच्या सोबत आहे, जिथं अडचण येईल तिथं मी तुमच्यासाठी उपलब्ध असेल. येत्या महिनाभरात वैजापूरला मेळावा घेऊन राहिलेल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश घेतला जाईल.

यापूर्वी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आज वैजापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढविण्याचा पाऊल उचललं जातंय. पंकज ठोंबरे सारखं एक सक्षम, लढवय्या, जो वैजापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच काम समर्थपणे करू शकेल असा एक युवा कार्यकर्ता आज काँग्रेस पक्षातून आपल्या पक्षात येत आहे याचा आनंद वाटतो. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

तत्पूर्वी पंकज ठोंबरे यांनी सांगितले की, वैजापूर तालुक्यात काम करत असताना शेवटच्या माणसा पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आदरणीय पवार साहेबांचे विचार पोहचविण्याचे काम करेल.

यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य विनायकराव गाडे, युवक अध्यक्ष सत्यजित सोमवंशी, एराज शेख, सरपंच भगतसिंह राजपुत, अमृत शिंदे, गणेश पवार, दिगंबर तुरकणे, दत्तात्रय खताने, गोकुळ कुंजीर, पुंडलिक गायकवाड, संदीप मोटे, रवींद्र निकम, रवी डोंगरे, सुनील कुंदे, वैभव जाधव, यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य यासह कार्यकर्ते आदींनी प्रवेश घेतला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तात्रय पाटील, सूरज पवार, बाळासाहेब भोसले, बाळासाहेब शेळके, एल एम पवार, विजय पवार, गणेश चव्हाण, आनंद निकम साईनाथ आहेर, संजय आहेर, रावसाहेब सावंत, ऋतुराज सोमवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com