दुचाकी व ट्रॅक्टरच्या भिषण अपघातात एक ठार तर दोघे जखमी

वैजापुर तालुक्यातील घटना
दुचाकी व ट्रॅक्टरच्या भिषण अपघातात एक ठार तर दोघे जखमी

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात असलेल्या नायर पेट्रोल पंपा जवळ ट्रॅक्टर व दुचाकी यांचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातात एक ठार तर दोघे जखमी झाले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चिंचडगाव जवळ असलेल्या नायरा पेट्रोल पंपा जवळ वैजापूरकडून गंगापूरच्या दिशेने चाललेल्या मोटारसायक (एम. एच.20 एफ.एन.5759) व ट्रॅक्टरची धडक झाली.

या अपघातात मोटारसायकलस्वार कृष्णा नानासाहेब घोगरे (वय 15 रा. काटेपिंपळ गाव) हा तरूण जागीच ठार झाला. तर प्रल्हाद भारत घोगरे (वय 15), चेतन विक्रम घाडगे (वय 15 दोघेही रा. काटे पिंपळगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमी तरूणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com