ट्रकची दुचाकीला धडक, महिला ठार

ट्रकची दुचाकीला धडक, महिला ठार

वैजापूर | वार्ताहर

ट्रकने दुचाकीला पाठीमागुन ठोकर दिल्याने महिला ठार व दुचाकी चालक गंभीर जखमी झाला.

ही घटना सोमवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास वैजापूर लाडगावं रस्त्यावर घडली. सुंदरबाई लक्ष्मण मतसागर (वय ५५, रा. जरुळ) असे मृताचे नाव असुन या घटनेत दुचाकी चालक मच्छिंद परबत वारकर (रा. कांगोणी) हे गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची अधिक माहिती अशी कि सुंदराबाई या त्यांचे भाऊ मच्छिंद्र परबत मतसागर यांना भेटण्यासाठी जरुळ येथुन हिंगोली येथे आल्या होत्या. सोमवारी सकाळी मच्छिंद्र वारकर व सुंदराबाई मतसागर हे दोघे दुचाकीवर (क्रमांक एम एच २० ईयु ८८४६) कांगोणी येथुन जरूळ येथे जाण्यासाठी निघाले. वैजापूर लाडगाव रस्त्यावर आल्यानंतर पेट्रोलपंपासमोर पाठीमागुन येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एम एच ४२ एक एफ ७७९७) त्यांना जोराची धडक दिली. या घटनेत सुंदराबाई यांच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने गंभीर दुखापत होऊन त्या जागीच गतप्राण झाल्या. मच्छिंद्र परबत मतसागर यांनाही गंभीर मार लागला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कैलास वारकर, अशोक वारकर, नवनाथ वारकर यांनी घटनास्थळी जाऊन दोघांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी सुंदराबाई यांना तपासुन मृत घोषित केले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. दरम्यान याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.