अगस्तीला मिळालेल्या कर्जाची पाठ थोपटून घेऊ नका- वैभव पिचड

अगस्तीला मिळालेल्या कर्जाची पाठ थोपटून घेऊ नका- वैभव पिचड

कोतुळ |वार्ताहर| Kotul

अगस्तीला चांगला कारभार देण्यासाठी शेतकरी विकास मंडळाला आशीर्वाद द्या, असे आवाहन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले. अगस्ती कारखाना निवडणुकीबाबत कोतूळ येथे आयोजित संवाद बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अगस्ती कारखान्याचे माजी संचालक सयाजीराव देशमुख होते.

अगस्ती कारखान्याला जिल्हा बँकेकडून मिळालेल्या 87 कोटींच्या कर्जाचे श्रेय कोणी घेऊ नये त्यासाठी अगस्तीच्या सर्व संचालकांचे श्रेय आहे. संचालकांनी स्वत:चे बाँड व हमीपत्र दिले आहे, यामुळे मिळालेल्या कर्जाचे श्रेय कोणी घेऊन स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये ,असा टोला माजी आमदार वैभव पिचड यांनी लगावला. ते म्हणाले, विद्यमान आमदारांनी अडीच वर्षात साधा वनराई बंधारा बांधला नाही, कुठे पाणी अडवले नाही, उलट तालुक्यातील जे आहे ते पाणी खाली पळविण्याचे काम केले. आमदार झोपेचे सोंग घेत आहेत त्यांना उठवता येणार नाही, अडीच वर्षात तालुक्यात खेळ खंडोबा झाला. एक महिन्यात रस्त्यांचे वाटोळे झाले, आता बोध घेण्याची वेळ आली आहे, असे माजी आमदार वैभवराव पिचड यावेळी म्हणाले.

अगस्ती कारखाना कडेलोटाकडे नेणार्‍यांचे या निवडणुकीत विसर्जन करा, असे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी बी. जे. देशमुख यांनी सांगितले. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या कार्यपद्धतीवर तसेच शेतकरी नेते कॉ डॉ. अजित नवले, राष्ट्रवादीचे अशोकराव भांगरे, काँग्रेसचे नेते मधुकरराव नवले यांच्यावर बी. जे. देशमुख यांनी सडकून टीका केली. पिचड यांनी अगस्तीची उभारणी केली त्यांना या वयात दुःख द्यायचे नाही म्हणून सर्वांनी शेतकरी मंडळाच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम पाटील देशमुख यांनी केले. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब रकटे, प्रकाश नवले, अ‍ॅड. सदानंद पोखरकर, रेश्मा गोडसे, संपतराव पवार, प्रा. सहदेव चौधरी, सागर देशमुख, बाबुराव देशमुख, सुभाष घुले, संजय लोखंडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष गिरजाजी जाधव, सरपंच भास्कर लोहकरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सयाजीराव देशमुख, रावजी धराडे, गणेश पोखरकर, अर्जुन गावडे, बाजार समितीचे उपसभापती भरत देशमाने, भीमराज देशमुख, माजी जि. प. सदस्य रमेश शेंगाळ, भानुदास देशमुख, भाऊसाहेब नाईकवाडी, संदीप शेटे, भाऊसाहेब देशमुख, राजेंद्र पाटील देशमुख, बाळासाहेब सावंत, रावसाहेब शेळके आदी सर्व उमेदवार व परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com