नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले नियमांचे पालन करा नाही तर....

नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले नियमांचे पालन करा नाही तर....

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

नगरपरिषदेचे काही अधिकारी कर्मचारी करोना बाधित कोविड-19 आल्यापासून आजपर्यंत

कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस करोना योद्धे म्हणूनच काम करत आहेत. अनेक अधिकारी व कर्मचारी करोनाबाधित झाल्याने रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे सर्वानीच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल. नियम भंग करणार्‍यावर कारवाई होईल. कुणीही कारवाई होत असतांना अडथळे आणू नयेत असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.

वहाडणे म्हणाले, शहरात किंवा तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांचे अंत्यसंस्कारही नगरपरिषदेचे कर्मचारीच करतात. रात्रीअपरात्रीही स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता जनतेची सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांची जाणीव नागरिकांनीही ठेवणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

या महामारीच्या काळात तर स्वच्छता राखण्यासाठी जनतेने शहराचे आरोग्य सांभाळण्यासाठी नगरपरिषदेला सहकार्य केलेच पाहिजे. कोविड सेन्टरमध्येही हेच कर्मचारी कार्यरत आहेत. रुग्णांचे नातलगही रुग्णाजवळ जायला भीत असतांना आरोग्य कर्मचारी मात्र रुग्णांची मनापासून सेवा करत आहेत. डॉक्टर, नर्सेस, आशा सेविका, पोलीस विभाग, महसूल विभाग जनतेच्या काळजीपोटी धडपडत असेल तर नागरिक म्हणून आपलेही काही कर्तव्य-जबाबदारी आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com