खडकावर उमटलेल्या पानांच्या ठशांवरून हवामानाचा अभ्यास

‘भवताल’चा नवा प्रकल्प || वडगाव दर्यातील चुनखडीच्या खडकावर आढळले ठसे
खडकावर उमटलेल्या पानांच्या ठशांवरून हवामानाचा अभ्यास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

‘भवताल’तर्फे आयोजित ‘वंडर्स ऑफ जिऑलॉजी’ या इको टूरमध्ये दगड (Stone), माती (Soil), तळ्यातील गाळ (Sludge in the Pond) हे निसर्गातील घटक स्वत:च्या निर्मितीबाबत महिती देतात. परंतु त्याच्या जोडीने दगडावर उमटलेले पानांचे ठसेसुद्धा अशी माहिती देतात, याचा उलगडा अलीकडच्या इकोटूरमधून झाला असल्याचे ‘भवताल’ या पर्यावरण संवर्धन विषयक (Environmental Conservation) संस्थेचे संस्थापक अभिजीत घोरपडे यांनी सांगितले.

खडकावर उमटलेल्या पानांच्या ठशांवरून हवामानाचा अभ्यास
नामांतराचा प्रस्ताव महापालिकेकडून तयार

इको टूरच्या माध्यमातून भूविज्ञानाच्या (Geology) भूमिकेतून विविध परिसराचा अभ्यास केला जातो. नगर जिल्ह्यातील पारनेर (Parner) हा अतिशय कमी पावसाचा (Rain) कोरडा तालुका असून तेथील वडगाव दर्‍या (Vadgaon Darya) (कान्हूर पठार) या ठिकाणी आपल्या काळ्या खडकापासून (बेसॉल्ट) काही चुनखडीचे खडक (Limestone Rocks) तयार झाले आहेत. ही निर्मिती काही शे, काही हजार वर्षांची किंवा त्यापेक्षाही जुनी आहे. या खडकावर त्या भागातील वनस्पतींची पाने (Leaves of Plants) पडली की त्यावर अनेकदा या पानांचे ठसे उमटतात.

खडकावर उमटलेल्या पानांच्या ठशांवरून हवामानाचा अभ्यास
भावाने केला बहिणीच्या प्रियकराची हत्या; कुठे घडली घटना ?

तसे ठसे उमटलेले खडक भवतालच्या इकोटूरमध्ये मिळाले आहेत. ते कोणत्या वनस्पतींचे आहेत याची ओळख पटवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तज्ञांची मदत घेण्यात येत आहे. त्यावरून, तिथे ज्या काळात हा चुनखडीचा खडक तयार झाला त्या काळी कशा प्रकारच्या वनस्पती होत्या हे शोधणे शक्य होईल. या शोधातून कोणत्या वनस्पती होत्या हे समजून त्या काळातील हवामानावरही प्रकाश पडेल.

यासंदर्भात भवतालतर्फे छोटा अभ्यास प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. आता कोरड्या असलेल्या प्रदेशात गेल्या काही हजार वर्षांमध्ये कशा प्रकारच्या वनस्पती होत्या आणि कसे हवामान होते यावर प्रकाश पडेल. या प्रकल्पामध्ये इकोटूरच्या माध्यमातून सामान्य नागरिकही सहभागी होऊ शकतील, असे अभिजित घोरपडे यांनी सांगितले. या प्रयत्नात सहभागी व्हायचे असेल तर संपर्क साधावा, असे आवाहन भवतालतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com