वाडेगव्हाण येथे तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

वाडेगव्हाण येथे तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

वाडेगव्हाण (Vadegavhan) येथील राळेगण फाटा (Ralegan Phata) येथील नवनाथ भानुदास शेळके (वय 35) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या (Youth Suicide) केली आहे.

याबाबत ज्ञानदेव यशवंत शेळके रा. वाडेगव्हाण (राळेगण सिद्धी फाटा) यांनी सुपा पोलिसांना (Supa Police) माहिती दिली आहे. यामध्ये नवनाथ भानुदास शेळके हा वाडेगव्हाण फाटा (Vadegvhan Phata) येथे कुंटुंबासह राहात होता. मंगळवार दि.10 मे 2022 रोजी पहाटे नवनाथ शेळके यांनी त्याच्या राहात्या घरी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास घराच्या छताच्या अँगलला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली.

सुपा पोलीसांना घटनेची माहिती कळताच सुपा पोलीस स्टेशनचे (Supa Police Station) पोलीस निरीक्षक डॉ. नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीसांनी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला. सदर मृतदेह उत्तराय तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात (Parner Rural Hospital) दाखल केला. पुढील तपास साहाय्यक फौजदार पठाण करत आहेत.

Related Stories

No stories found.